यशवंत सिन्हा काढणार सीएएविरोधात मुंबई ते दिल्ली रॅली

463
Mumbai: Former union minister Yashwant Sinha along with actor-politician Shatrughan Sinha and former Gujrat CM Suresh Mehta addresses a press conference to announce the 'Bharat Jodo Yatra 2020' in Mumbai, Saturday, Jan. 4, 2020. (PTI Photo/Shashank Parade) (PTI1_4_2020_000088B)

सुधारित नागरिकत्व कायद्याला देशभरातील विविध राजकीय पक्षांबरोबरच सामाजिक संघटनांकडून मोठय़ा प्रमाणात विरोध होत आहे. भाजपचे नाराज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशकंत सिन्हा यांनीदेखील या कायद्याविरोधात दंड थोपटले आहेत. ‘सीएए’च्या विरोधात मुंबई ते दिल्ली अशी रॅली काढण्यात येणार असल्याची घोषणा यशवंत सिन्हा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

राजकीय कृती समूह राष्ट्र मंच या संघटनेच्या माध्यमातून सीएएविरोधात मुंबई ते दिल्ली अशी ‘भारत जोडो यात्रा 2020’ काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात जनजागृती करून हा कायदा केंद्र सरकारला मागे घेण्यासाठी भाग पाडण्यात येईल, असे यशवंत सिन्हा म्हणाले. अभिनेते-राजकारणी आणि काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री सुरेश मेहता हेदेखील या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

महाराष्ट्रासह सहा राज्यांतून जाणार यात्रा

सीएएविरोधात काढण्यात येणाऱया या यात्रेची सुरुवात 9 जानेवारी रोजी मुंबईतून होईल आणि 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजघाट दिल्ली येथे पोहोचेल. 21 दिवसांची ही यात्रा महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि दिल्ली या सहा राज्यांतून जाईल. सुमारे तीन हजार कि.मी. यात्रेमध्ये विविध राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, व्याकसायिक, संघटना आणि विचारकंत भाग घेणार असल्याची माहिती यशवंत सिन्हा यांनी दिली.

देशभरातून नागरिकत्व सुधारणा कायद्याला (सीएए) विरोध होत असताना मुंबईत शनिवारी चित्रकारांनीही आपल्या कलेच्या माध्यमातून निषेध नोंदवला. सेक्युलर आर्ट मूव्हमेंटच्या वतीने सीएएला चित्रांच्या माध्यमातून विरोध करण्यासाठी आझाद मैदानात व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार अनेक चित्रकारांनी रंगछटातून आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सीएएविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

शेजारच्या नाही, देशातील समस्यांकडे लक्ष देण्याची गरज – शत्रुघ्न सिन्हा

नागरिकत्व सुधारणा कायदा आणून शेजारच्या देशातील अल्पसंख्याकांना या देशात येऊन राहण्याची परवानगी दिली जात आहे, परंतु मुस्लिमांना यातून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात येत आहे. यातून सरकारचा दुटप्पीपणा यातून उघड होत आहे. केंद्र सरकारने शेजारच्या नाही, तर आपल्या देशात भेडसावणाऱया समस्यांकडे लक्ष द्यावे, असा टोला भाजपचे माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी लगावला. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात उभे राहून देशाची राज्यघटना वाचविण्याची वेळ आज आली आहे. आजवर आम्ही सहन केले. आता गप्प बसून चालणार नाही, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या