श्रीनिवास पाटील यांना यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर

1228

श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने प्रतिवर्षी दिला जाणारा यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ सिक्कीमचे माजी राज्यपाल व सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांना जाहीर झाला आहे. 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात (कराड) येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आनंद दीक्षित हे या सोहळ्याला उपस्थित राहणार असून, इंद्रजित देशमुख सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत, अशी माहिती कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. अशोक चव्हाण व चेअरमन डॉ. जयवंत सातपुते यांनी दिली. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी व श्री कालिकादेवी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुरु केलेल्या या उपक्रमामध्ये यापूर्वी ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, रानकवी ना. धो. महानोर, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे, शांतीलाल मुथा व इंद्रजित देशमुख यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या