टोल नाक्यावरील रिक्षाच्या भयंकर अपघातात महिला जागीच ठार, घटना CCTV मध्ये कैद

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत भांब (राजा) जवळ असलेल्या टोल नाक्यावर रिक्षाला भयंकर अपघात होऊन एक महिला जागीच ठार झाली. ललिता प्रकाश जाधव (वय – 35, वेणी बुद्रुक) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर रिक्षा महागाव तहसील येथून यवतमाळकडे भरधाव वेगात येत होती. भांब जवळ असलेल्या टोल नाक्यावर रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने महिला खाली पडली. खाली पडताच रिक्षाचे चाक महिलेच्या डोक्यावरून गेल्याने ती जागीच ठार झाली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे जमादार भगवान बावणे पुढील तपास करीत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)