वर्षभरापूर्वी लग्न करून आणलेली बायको मित्रानेच पळवली, ‘त्याचा’ खून करून घेतला बदला

2246
प्रातिनिधिक फोटो

अवघ्या वर्षभरापूर्वी विवाह करून घरी आणलेल्या पत्नीला जवळच्याच मित्राने फूस लावून पळविले. याचा संताप डोक्यात धरून मध्यरात्री मित्राच्या घरात शिरून त्याचा खात्मा केल्याची घटना यवतमाळ जवळच्या भोयरगावात घडली. याप्रकरणी पोलिसांनी रंगराव घोटेकर याला अटक केली आहे.

वर्षभरापूर्वी रंगराव घोटेकर याचा भाग्यश्री हिच्यासोबत विवाह झाला होता. त्याच्या पत्नीला रंगरावांचा मित्र गणेश टेकाम यांने पळवून नेले. या घटनेपासून रंगरावच्या डोक्यात प्रचंड राग होता. काल सायंकाळी रंगरावणे गणेशच्या घरी गेला आणि दोघांमध्ये भांडण झाले. यावेळी दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली. पत्नी सोबत येत नाही हे पाहून चिडलेल्या रंगरावने गणेशला ठार मारण्याची धमकी देऊन तिथून निघून गेला.

मात्र मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास सूडाने पेटलेल्या रंगरावने गणेशच्या घरात घुसून झोपेतच त्याच्यावर हल्ला चढवला व त्याला जबरदस्त मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी रंगराव याची पत्नी भाग्यश्री घोटेकरच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला व आज त्याला अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या