Video- रस्त्यात दारूच्या बाटल्यांचा सडा, बेवड्यांचा राडा

679

एकीकडे राज्यात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सुगंधी मसाले दूध बनवण्याचे बेत सुरू होते तर दुसरीकडे यवतमाळमध्ये दारूच्या बाटल्या मिळवण्यासाठी राडा सुरू होता. फुकट मिळालेल्या दारूच्या बाटल्या मिळवण्यासाठी बेवड्यांची भर रस्त्यात अभूतपूर्व ढकलाढकली पाहायला मिळाली. घटना मारेगाव तालुक्यातील मार्डी इथली असून ती रविवारी घडली आहे.

एक दारू तस्कर आपल्या गाडीच्या डिकीमध्ये दारूच्या बाटल्या भरून नेत होता. मार्डी भागातील एका होमगार्डने त्याला अडवले. पोलीस अडवत असल्याचे पाहून या तस्कराने गाडी जोरात पळवायचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याची गाडी घसरली. आपल्याला पकडतील या भीतीने तस्कराने त्याची गाडी तिथेच सोडून पळ काढला. इकडे गाडी घसरल्याने त्यातल्या दारूच्या बाटल्यांचा रस्त्यावर सडा पडला. मग काय बेवड्यांना घसा ओला करायची आयती संधी मिळाली. या बेवड्यांनी जितक्या पळवता येतील तितक्या बाटल्या पळवल्या. होमगार्डने या बेवड्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र बेवड्यांच्या झुंडीपुढे त्याचे काहीही चालले नाही. एकूणच काय तर रविवारची रात्र तळीरामांनी जोरात साजरी केली आणि त्यासाठीचे बेवड्यांची ढकलाढकली पाहून बघ्यांचे प्रचंड मनोरंजन झाले.

आपली प्रतिक्रिया द्या