कीटकनाशक विषबाधा प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

22

सामना ऑनलाईन । यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील कीटकनाशक विषबाधा प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी विनंती राज्य सरकारने पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात शेतातील कापूस पिकावर कीटकनाशकांची फवारणी करताना झोलेल्या विषबाधेमुळे १५ दिवसांमध्ये १८ शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. तर, ७५० शेतकरी अत्यवस्थ झाले होते. केंद्रीय कॉटन रिसर्च इन्स्टिट्युटने या प्रकरणी अहवाल दिल्यानंतर राज्य सरकारने सीबीआय चौकशीची मागणी केंद्राकडे केली आहे.

केंद्रीय कॉटन रिसर्च इन्स्टिट्युटच्या अहवालानुसार, पाच कंपन्यांच्या बीटी कॉटन बियाण्यांमध्ये ‘हर्बिसाईड टॉलरन्ट जीन्स’ आढळून आले. हे जीन्स पर्यावरण संरक्षण कायदा १९८६मधील तरतुदींनुसार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या पाचही कंपन्यांविरूद्ध नागपूर येथे एफआयआर नोंदविण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये अशाप्रकारच्या बियाण्यांचे उत्पादन होत असल्याने याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी विनंती राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या