Yavatmal News : पांढरकवडा येथे सिलेंडरचा स्फोट; लाखो रुपयांचे नुकसान, सुदैवाने जिवीतहानी नाही

>>प्रसाद नायगावकर

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा शहारात असणाऱ्या वैभव नगर परिसरात बेतवार लेआउट भागातील एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. या भयानक आगीमध्ये घरात ठेवलेल्या सिलेंडरचा मोठा स्फोट झाला.

सदर घटना जिल्ह्यातील पांढरकवडा शहातील वैभव नगरमध्ये घडली आहे. वैभर नगर भागामध्ये असणाऱ्या हेमंत काशीनाथ मुजोरीया यांच्या घराला अचानक आग लागली होती. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केल आणि आग सर्वत्र पसरली. त्यामुळे घरात असलेल्या सिलेंडरचा मोठा स्फोट होऊन सिलेंडरचे तुकडे झाले. या भयानक आगीमध्ये घरातील सर्व मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या. हेमंत मुजोरिया यांनी कष्टाने उभारलेला संसार उघड्यावर पडला असून मुजोरिया कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील सदस्य बाहेर असल्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही. अग्निशनम दल आणि परिसरातील नागरिकांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.