येडीयुरप्पा ‘इडली’ वादात

40

सामना ऑनलाईन, टुमकूर

कर्नाटकमधील भाजपचे अध्यक्ष बी.एस. येडीयुरप्पा हे एका नव्या वादात अडकले आहेत. येडीयुरप्पा यांनी दलितांना भुलविण्यासाठी चक्क एका दलित नागरिकाच्या घरी जेवण्याचे नाटक केले. मात्र प्रत्यक्षात ते खात असलेली ‘इडली’ ही त्या घरात बनलेली नव्हती तर खास त्यांच्यासाठी हॉटेलमधून मागविली होती.

या प्रकरणी त्या कुटुंबातील डी. वेंकटेश यांनी त्यांच्यावर अस्पृश्यतेची वागणूक दिल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. येडीयुरप्पा शनिवारी टुमकूर जिह्याच्या दौऱ्यावर गेले होते. तेथे ते काही स्थानिक भाजप नेत्यांसोबत एका दलित व्यक्तीच्या घरी गेले व दलित कुटुंबासोबत जेवले होते.

आपली प्रतिक्रिया द्या