कर्नाटक : येडियुरप्पा यांचे पद धोक्यात, ज्येष्ठांची नाराजी असल्याचा भाजप आमदाराचा दावा

bjp-mla-basangouda-p-yatnal

कर्नाटकातील खूर्चीसाठीची लढाई अद्याप संपलेली नाही. मुख्यमंत्रीपदावर असलेल्या बीएस येडियुरप्पा यांच्याविरोधात पक्षातील अन्य आमदार नाराजी व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री लवकरच बदलले जातील कारण पक्षातील ज्येष्ठ नेतेच येडियुरप्पा यांच्या कामगिरीवर नाराज असल्याचे भाजपचे आमदार बसंगौडा पी यतनाल यांनी पक्षाच्या एका कार्यक्रमात सांगितले. यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

बसंगौडा पी यतनाल येथील एका कार्यक्रमात बोलताना येडियुरप्पा यांचे पद धोक्यात असल्याचे स्पष्ट केले. ‘मुख्यमंत्री लवकरच बदलले जातील कारण पक्षातील ज्येष्ठ नेतेच येडियुरप्पा यांच्या कामगिरीवर नाराज आहेत. पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा सांगितले आहे की पुढले मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकातून असतील. येडियुरप्पा हे मुख्यमंत्री झाले याचे कारणच मुळी उत्तर कर्नाटक आहे. उत्तर कर्नाटकचे 100 च्या आमदारांनी त्यांना मुख्यमंत्री बनवले आहे, असेही ते म्हणाले.

पक्षातूनच वाढलेल्या या विरोधामुळे आता येडियुरप्पा यांच्यासाठी मुख्यमंत्रीपद टिकणवणे हे मोठं आव्हान ठरणार आहे. गेल्या महिन्यात देखील बाहेरून आलेल्या आमदारांची बैठक यासंदर्भात झाल्याचे वृत्त होते. आता मात्र उघड उघड विरोध दिसत आहे. त्यामुळे येडियुरप्पा यांचे पद धोक्यात असल्याचे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या