येडियुरप्पा यांच्या मुलाच्या गाडीच्या धडकेत एक ठार

38
सामना ऑनलाईन । बेंगळुरू
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र व भाजपचे आमदार राघवेंद्र यांच्या गाडीच्या धडकेत एक तरुण ठार झाला आहे. सुरेश असे या मृत तरुणाचे नाव आहे. मध्य कर्नाटकमधील होन्नळी येथे गुरुवारी ही घटना घडली आहे.
गुरूवारी रात्री राघवेंद्र बेंगळुरूहून शिखरीपुराला येत होते. त्याचवेळी अचानक त्यांच्या गाडीची धडक रस्त्यावरुन चालणाऱ्या सुरेशला बसली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी राघवेंद्र यांच्या गाडीचालकाला रवीकुमारला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश मद्यधुंद अवस्थेत होता व त्याने रिक्षातून आपल्या गाडीसमोर उडी मारल्याचा आरोप राघवेंद्र यांनी केला आहे.
आपली प्रतिक्रिया द्या