येमेनमध्ये लग्न सोहळ्यात हवाई हल्ला, २० ठार

31

सामना ऑनलाईन । दुबई

सौदी अरेबियाने येनेमवर केलेल्या हवाई हल्ल्यात २० नागरिकांना मृत्यू झाला आहे. लग्न सोहळ्याला एकत्र जमलेल्या लोकांवर हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. येमेनच्या हाजा प्रांतातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नागरिकांमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. याशिवाय यामध्ये ४०हून अधिक लोक जखमी झाले असून यामध्ये नवऱ्या मुलीचाही समावेश आहे.

अल जुमहोयुरी रुग्णालयाच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालायात आणलेल्या मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होते. या हल्यात चाळीसहून अधिक जण जखमी असून जखमींमध्ये ३० लहान मुलांचा समावेश आहे. हल्ल्यानंतर अॅम्बुलन्सही घटनास्थळी वेळेत पोहचू शकल्या नाही. हल्ल्यानंतरही हल्ला करणारे फायटर विमात आकाशात उडत होते. सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली कारवाई करणाऱ्या फौजांनी सामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचा नव्हता. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करु असे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या