कोरोना काळातील किमचे ‘धंदे’, 2000 सेक्स स्लेव्हसोबत विलगीकरणात राहिल्याचा दावा

175586123_1901501096686482_6906986722898047672_n

येओनमी पार्क ही उत्तर कोरियातील मानवाधिकार कार्यकर्ता आहे. किम जोंग उन विरोधात ती सातत्याने आवाज उठवत असते. येओनमीला भीती आहे की तिची किम जोंग उन हत्या घडवून आणू शकतो.

148315970_802100823982077_7252018885956192078_n

2007 साली येओनमीने मानव तस्करी करणाऱ्यांना लाच दिली होती. या लोकांच्या मदतीने ती अमेरिकेला आली होती. तिच्या वडिलांना कर्करोग झाला होता आणि किम जोंग उनने त्यांना छळ छावणीत डांबलं होतं असा आरोप तिने केला आहे.

165254380_1348434965535310_2532892061050558584_n

येओनमी ही सध्या शिकागोमध्ये राहात असून आपण किम जोंग उनचा काळा चेहरा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं तिचं म्हणणं आहे. तिने तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दावा केला आहे की किम जोंग उन कोरोना काळात 2 हजार सेक्स स्लेव्हसोबत राहिला होता.

163625104_2537878356515356_4906081364521164328_n
येओनमीने दावा केला आहे की कोरोना काळात किम हा त्याच्या २ हजार सेक्स स्लेव्हसोबत वॉन्सन कंपाऊंड नावाच्या अत्यंत सुंदर भागात विलगीकरणात होता. या २ हजार सेक्स स्लेव्ह धनाढ्यांच्या वासनेचे चोचले पुरवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका दलाचा भाग असल्याचं येओनमीचं म्हणणं आहे.152231471_247664603750626_2787136720948703408_n

येओनमीने दावा केला आहे की किम जोंग उनच्या निशाण्यावर ती असून त्याची माणसे तिचा कधीही खून करू शकतात. आपल्याला सातत्याने धमक्या मिळत असल्याचंही तिचं म्हणणं आहे.

166602588_251225436734987_4922490116724590645_n

मी आणि माझी आई देश सोडून पळून गेल्याने माझ्या सगळ्या नातेवाईकांना एकतर ठार मारण्यात आलं किंवा तुरुंगात डांबण्यात आलं असं येओनमीचं म्हणणं आहे.

147914324_179801930179019_496460371497270862_n

किम जोंग उनने 2007 साली त्याच्या सावत्र भावानाला ठार मारलं होतं. मलेशियाच्या विमानतळावर त्याची हत्या करण्यात आली होती. सावत्र भाऊ सत्तेवर दावा ठोकेल या भीतीपोटी किमने त्याला ठार मारलं होतं. 171056179_464828028297289_3026788261529743977_n

येओनमीचं म्हणणं आहे की जमाल खशोगी सारख्या पत्रकारांना तुर्कस्तानने ठार मारलं होतं. यावरून स्पष्ट होतं की हुकूमशहा कोणत्याही देशात त्याची माणसे पाठवून हत्या घडवून आणू शकतो आणि त्याबद्दल त्यांना कोणतंही शासन होत नाही. यामुळे मी सतत दहशतीच्या सावटाखाली असते.

 

आपली प्रतिक्रिया द्या