इटलीच्या जिफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’

‘येरे येरे पावसा’ हा आगामी मराठी चित्रपट विविध परदेशी चित्रपट महोत्सवांत चांगला गाजतोय. इटलीच्या 51व्या ‘जिफोनी’ चित्रपट महोत्सवासाठी ‘येरे येरे पावसा’ची निवड झाली आहे. टोरंटो, कॅनडा आणि टोकियो आदी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत यशाच्या आणि पुरस्कारांच्या सरी झेलणारा हा चित्रपट आता जिफोनी महोत्सव गाजवायला सज्ज झाला आहे. ‘एलिमेंट सहा’ या विभागात या चित्रपटाची निवड झाली आहे. महोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे 6 ते 9 या वयोगटातील 800 मुलं परीक्षक असणार आहेत. इटलीत या चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच संपन्न झाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती शारीक खान तर सहनिर्मिती बटरफ्लाय फिल्म्सची आहे.

आपली प्रतिक्रिया द्या