आता धावा कोणाचा करायचा ? Yes Bank मध्ये ‘देवा’चेही पैसे अडकले

3045

Yes Bank मध्ये लाखो खातेधारकांचे पैसे अडकलेले आहेत. पैसे काढण्यासाठी मर्यादा घालण्यात आल्याने हे ग्राहक आपल्या ठेवींचे आता काय होणार या विवंचनेत अडकलेले आहेत. पैसे परत मिळणार की नाही या चिंतेने त्रासलेल्या ग्राहकांनी सगळी ठेव परत मिळावी यासाठी आता देवाचा धावा करायला सुरुवात केली आहे. मात्र या बँकेमध्ये देवाचेही पैसे अडकल्याचे वृत्त आहे.

ओडिशातील जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिराची 545 कोटींची ठेव Yes Bank मध्ये ठेवण्यात आली आहे. यामुळे मंदिराचे पुजारी आणि भक्त विशेष चिंतेत पडलेले आहेत. बँकेला नवं भांडवल मिळत नव्हतं दुसरीकडे बँकेतून पैसे काढणाऱ्यांची संख्याही वाढत चालली होती. त्यातच बँकेने दिलेली अवाढव्य कर्ज बुडीत खात्यात गेली ज्यामुळे बँकेची अवस्था पातळ झाली होती. याचा फटका सामान्य ग्राहकांप्रमाणे पुरीच्या जगन्नाथालाही बसला आहे.

पुरी मंदिराचे पुजारी असलेल्या विनायक दासमहापात्रा यांनी एकूण परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी मागणी केली आहे की थोडं अधक व्याज मिळेल या आमिषाला बळी बडून मंदिराच्या ज्या लोकांनी या बँकेमध्ये ठेवी ठेवल्या त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात यावी. जगन्नाथ सेनेचे संयोजक प्रयदर्शी पटनायक यांनी तर म्हटलंय की देवाची संपत्ती खासगी क्षेत्रातील बँकेकडे ठेवणे गे बेकयादेशीर आणि अनैतिक आहेत. त्यांनी जगन्नाथ मंदिर प्रसासनाला यासाठी जबाबदार धरले आहे. पटनाईक यांनी म्हटलंय की त्यांनी देवाचा पैसा खासगी बँकेत ठेवला जात असल्याच्या विरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली होती, मात्र पोलिसांनी यासंदर्भात काहीही कारवाई केली नाही. ओडिशाचे अर्थमंत्री प्रताप जेना यांनी मात्र हे सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचं आणि भीती उगाच दाखवली जात असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलंय की बँकेत ठेवलेली रक्कम ही मुदत ठेव स्वरुपात आहे. ठेवीची मुदत संपल्यानंतर ही रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्यात येईल असं जेना यांनी स्पष्ट केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या