Yes Bank घोटाळा; अंबानी, चंद्रा, गोयल यांना ईडीचे समन्स

1531

येस बँक घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 11 मोठय़ा उद्योग समूहांवर लक्ष केंद्रित केले आहे. या 11 समूहांनी येस बँकेकडून 42 हजार 136 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन ते बुडवले आहे. यामध्ये रिलायन्स समूहाचे चेअरमन अनिल अंबानी, झी समूहाचे सुभाष चंद्रा आणि जेटचे नरेश गोयल यांचेही नाव असून ईडीने त्यांना समन्स जारी केले आहे.
येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांची पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी चौकशी सुरू असताना अनिल अंबानींना समन्स बजावण्यात आले आहे. ‘पीएमएलए’ कायद्यानुसार अनिल अंबानी यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. येस बँकेने दिलेल्या कर्जाच्या संदर्भात त्यांची चौकशी केली जाणार आहे. अंबानी यांच्या कंपनीने येस बँकेकडून 12 हजार 800 कोटींचे कर्ज घेतले होते, जे बुडीत झाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहितीही दिली होती. अनिल अंबानी यांना शनिवारीच समन्स बजाकण्यात आले होते, मात्र त्यांनी वैद्यकीय कारण देत हजेरीसाठी अधिकचा वेळ मागितला होता. त्यांनी हजेरी न लावल्यास ईडी दुसरा समन्स जारी करेल. अन्यथा रिलायन्स फायनान्शियलच्या अधिकाऱ्यांना बोलावले जाऊ शकते.

कोणत्या कंपन्यांनी बुडवले कर्ज
मोठय़ा बुडीत कर्जांमध्ये सर्वाधिक 12 हजार 808 कोटी रुपयांचे कर्ज अनिल अंबानी यांच्या अनिल धिरुभाई अंबानी समूहाला (एडीएजी) देण्यात आले. या समूहातील दहा कंपन्यांना हे कर्ज देण्यात आले. ती सर्क कर्जखाती बुडीत खात्यात गेली. यापाठोपाठ 8415 कोटी रुपये एस्सेल समूहाला देण्यात आले. समूहातील एकूण 16 कंपन्यांना कर्ज काटप करण्यात आले. याखेरीज घोटाळा झालेली दिकाण हौसिंग फायनान्स कंपनी (डीएचएफएल), आयएल ऍण्ड एफएस समूह, इंडिया बूल्स, खेतान समूह यांचाही या बुडीत कर्जखात्यांमध्ये समाकेश आहे. जेट एअरकेज ही विमानसेवा कंपनी अलीकडेच बंद पडल्याने चांगलीच चर्चेत आली. कंपनीच्या डोक्याकर जकळपास 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या