होय ती करू शकते! बराक ओबामा यांचा कमला हॅरिस यांना जाहीर पाठिंबा

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची यंदाची निवडणूक सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. अमेरिकेतील शिकागो येथे सोमवारपासून डेमोक्रेटिक नॅशनल कन्व्हेन्शन (डीएनसी) सुरू झाले. डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शनच्या (DNC) दुसऱ्या दिवशी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना जाहीरपणे पाठिंबा दिला.

बराक ओबामा यांनी आपल्या भाषणा दरम्यान उपस्थितांचे स्वागत केले. तसेच यावेळी त्यांनी कमला हॅरिस आणि टीम वॉल्झ यांच्या कामाचेही कौतुक केले. “या नवीन अर्थव्यवस्थेत, आम्हाला अशा राष्ट्रपतीची गरज आहे जो या देशभरातील लाखो लोकांची खरोखर काळजी घेईल. देशाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. रस्ते व्यवस्थेवर जबाबदारीने लक्ष घालेल. तसेच नागरिकांच्या हक्कासाठी, त्यांच्या कामासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील,” या सगळ्या गोष्टी कमला हॅरिस यांच्याकडे आहेत. होय ती हे सगळं नक्कीच करू शकते, असा ठाम विश्वास यावेळी बराक ओबामा यांनी व्यक्त केला.

दरम्यान हॅरिस 5 नोव्हेंबरला इतिहास रचणार आहेत. आशियाई वंशाच्या त्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. आम्ही हॅरिसकडे मशाल दिली आहे. पण डेमोक्रॅट्सचे काम अजून संपलेले नाही, असेही बराक ओबामा म्हणाले.

कमला हॅरीस यांच्या हाती ‘मशाल’, डेमोवक्रेटिकच्या अधिवेशनात अधिकृत उमेदवारी जाहीर