निरोगी डोळ्यांसाठी आणि नजर वाढवण्यासाठी कोणती योगासने कराल ? जाणून घ्या

डोळे हा शरीरातला सर्वात नाजूक आणि महत्त्वाचा अवयव. डोळ्यांची दृष्टी सुधारण्याकरिता डोळ्यांची योग्य निगा राखणे आवश्यक आहे. योगासनांमुळे डोळ्यांची नजर अबाधित राहते. हल्ली सतत मोबाईलमध्ये पाहणे किंवा लॅपटॉप, संगणकावर काम केल्याने दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. यासाठी काही योगासने करून तुम्ही डोळ्यांचे आरोग्य जपू शकता.

भूमिपाद मस्तकासन
भूमिपाद मस्तकासन हे योगासन दररोज केल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते. याशिवाय मान, पाठ, पाय आणि हाताचे स्नायू मजबूत व्हायला मदत होते. कानांची ऐकण्याची क्षमताही या आसनामुळे वाढते. एकाग्रता वाढवून ताणतणाव कमी करण्याकरिता हे आसन करतात.

सूर्यनमस्कार
दररोज सूर्यनमस्कार केल्याने शरीराचे अतिरिक्त वाढलेले वजन कमी होण्याबरोबरच डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखले जाते. दृष्टी कमी असेल तर नियमित 10 सूर्यनमस्कार करा.

शवासन
शवासन केल्यामुळे थकवा दूर होतो. डोळ्यांना बराच आराम मिळतो. हे आसन केल्यामुळे दृष्टी सुधारते. शरीराला विश्रांती मिळते.

बद्धकोणासन
बद्धकोणासन या आसनाला फुलपाखरू आसन असेही म्हणतात. कारण हे आसन करताना शरीराचा आकार फुलपाखरासारखा करावा लागतो. बद्धकोणासनामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्याबरोबर सांधे मजबूत होतात. डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

त्राटक योग
दृष्टी सुधारण्याबरोबरच डोळ्यांचे विकार दूर होण्यासाठी त्राटक करावे. यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. नियमित त्राटक केल्याने ताणतणाव, चिंता आणि थकवा दूर व्हायला मदत होते.

आपली प्रतिक्रिया द्या