उन्हाचं गाव

रवी दीक्षित ,योगतज्ञ

‘व्हिटॅमीन-डी’साठीच सूर्यस्नान….

सूर्यस्नान, सनबाथ हे शरीराला व्हिटॅमीन-डी मिळण्यासाठीच घेतले जाते. सूर्याची ऊर्जा शरीराला मिळायला पाहिजे यासाठीच सूर्यस्नान घेतात. सूर्यनमस्कार आणि सूर्यस्नान यात जास्त फरक नाही. सूर्याकडून काहीतरी मिळवण्यासाठी त्याची केलेली उपासना म्हणजे सूर्यनमस्कार आणि त्याच्या प्रकाशाने शरीराला व्हिटॅमीन-डी मिळवण्याचा सूर्यस्नान हा एक प्रकार आहे. परदेशात सर्वच लोक सनबाथ घेतात. पण तेथे अलिकडे हे प्रस्थ वाढले आहे. पण हिंदुस्थानात पुराणातच ते लिहून ठेवलेले आहे.

अन्य व्यायामांबरोबर करायचा

सूर्यनमस्कार हा एक चांगला व्यायाम आहे हे मानता येईल, पण तो सर्वांगीण व्यायाम म्हणता येणार नाही. हा बॅलेन्स्ड व्यायाम नाही. कारण कोणत्याही व्यायाम प्रकाराने शरीराच्या सर्व भागांना फायदा होतो. पण सूर्यनमस्कारात तसं होत नाही. यात मनुष्य पुढे वाकतो, मागे वाकतो किंवा स्ट्रेच करतो. म्हणूनच हा उत्तम व्यायाम असला तरी तो पूर्ण व्यायाम नक्कीच नाही. तो संतुलित व्यायाम नाही. सूर्यनमस्कारापासून ठरावीक अंगांना फायदा होतो. हार्टरेट वाढतो, बीपी वाढतो, घाम येतो. पण योगाभ्यासासारखं रिलॅक्सेशन मिळत नाही. त्या दृष्टीने योगा सर्वच दृष्टीने चांगला ठरतो. सूर्यनमस्कार हा डायनॅमिक प्रकार आहे, तर योगा हा स्टॅटिक प्रकार आहे. योगाभ्यासात आपल्या सर्व अवयवांना फायदा होतो. सूर्यनमस्काराने केवळ घाम येतो, शरीरातील वाईट पदार्थ बाहेर फेकले जातात. पण तो पूर्ण व्यायाम नाही. सूर्यनमस्कार करता करता बाकीचे व्यायाम करावे लागतात.

मन आणि शरीर तंदुरुस्त तर सगळं काही हिट अन् फिट… त्यासाठी लोक बरेच उपाय करून पाहातात. पण अनेक प्रॉब्लेम्स दूर करता येतील असा एकमेव सोपा उपाय म्हणजे सूर्यनमस्कार… वजन कमी करण्यासाठी तर त्याचा उपयोग होतोच, पण सहनशक्ती वाढवायची असेल तरीही सूर्यनमस्काराशिवाय पर्याय नाही. एकूणच फिजिकल फिटनेस राखण्यासाठी सूर्यनमस्कार हा उत्तम व्यायाम आहे. मात्र ते शास्रशुद्ध आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हवेत.

सूर्यनमस्कार हा व्यायाम प्रकार हिंदुस्थानीच आहे. आपल्या पुराणात, वेदांमध्ये त्याचा उल्लेख आहे. सूर्यनमस्कारामुळे अनेक आजार टाळता येऊ शकतात. लठ्ठपणा, श्वास घेण्यास त्रास होणं, डायबिटीस असे अनेक विकार सूर्यनमस्कारामुळे कमी होऊ शकतात. सूर्यनमस्कार घालताना खरी आणि योग्य पद्धत म्हणजे प्रत्येक नमस्काराच्या वेळी सूर्याचे एकेक नाव घेतलं जातं. या नावांचा या क्रियेशी नक्कीच संबंध आहे. यासाठी १२  मंत्र आहेत. त्यामध्ये सूर्याची सगळी नावे आलेली आहेत. सूर्याला नमस्कार घालताना ती घेतली जावीत असं पुराणातही सांगितलंय.

सूर्य म्हणजे बेकिसली व्हिटॅमीन-डी… शरीराला ते मिळणं खूप गरजेचं आहे. हे व्हिटॅमीन शरीराला एनर्जी पुरवतं. त्यामुळे त्याची उपासना करणे गरजेचं आहे. सकाळीच सूर्यनमस्कार घालावेत असंही म्हटलं गेलंय. योगा आणि पुराणात हे सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे ओव्हरऑल फिटनेससाठी सूर्यनमस्कार फार महत्त्वाचे आहेत. साधारणपणे दिवसभरात १० ते १२ सूर्यनमस्कार घालायला हवेत. अशावेळी नेहमीचे जेवण घेतले तरी चालू शकते. पण १०८ सूर्यनमस्कार घालायचे तर भरपूर थकवा येतो. त्यामुळे मग भरपूर प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ जेवणात असायला हवेत. संतुलीत आणि नेमका आहार फार महत्त्वाचा ठरतो.

आपली प्रतिक्रिया द्या