शंभर वर्षे पुरातन योगा इन्स्टिट्यूटला राज्यपालांची भेट

190

जगातील पुरातन योगा केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱया मुंबईतील द योगा इन्स्टिटय़ूटला 101 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भेट दिली. महापालिकेतील 10 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना योगाचे धडे देणाऱया या केंद्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी कौतुक केले. योगा ही हिंदुस्थानींना मिळालेली देणगी असून या संस्थेमार्फत गेल्या 100 वर्षांपेक्षा जास्त काळापासून अखंडपणे योगाचे धडे दिले जात आहेत. यापुढेही ही सेवा अशीच सुरू राहू दे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. इन्स्टिटय़ूटच्या लाइफ स्कूल प्रोजेक्टलाही यंदा 25 वर्षे पूर्ण झाली. या कार्यक्रमाप्रसंगी द योगा इन्स्टिटय़ूटचे डायरेक्टर हंसा योगेंद्र, मदन बहल उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या