काँग्रेस नेत्याच्या मुलीसोबत झालं योगेश्वर दत्तचं लग्न

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

कुस्तीपटू योगेश्वर दत्त याचा विवाहसोहळा दिल्लीतील अलूपूर भागातील जेहान गार्डनमध्ये सोमवारी पार पडला. २०१२ साली लंडन ऑलिम्पिकमधअये कांस्य पदक मिळवल्यानंतर योगेश्वर दत्त प्रकाशझोतात आला होता. त्याच्या लग्नाला मोठ्या संख्येने राजकारणी, खेळाडू उपस्थित होते.

काँग्रेसचे नेता जयभगवान शर्मा यांची मुलगी शीतल शर्मा हिच्याशी योगेश्वर याचा विवाह झाला. या दांपत्याला शुभेच्छा देण्यासाठी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा, तिथले काँग्रेस प्रदेशाध्यक्षअशोक तंवर, भाजपाचे वरिष्ठ नेता मुरली मनोहर जोशी या लग्नसोहळ्याला आले होते. दिल्लीतील महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल या देखील लग्न सोहळ्याला उपस्थित होत्या. लग्नानंतरही कुस्तीचा सराव सुरू ठेवणार असून आपलं पुढचं लक्ष्य हे राष्ट्रकुल स्पर्धा आहेत असं यागेश्वरने सांगितलं.