राहुल गांधी प्रचाराला जातील तिथे काँग्रेसचा पराभव निश्चित!

31

सामना ऑनलाईन, वलसाड

गुजरात दौऱ्यावर असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर तिखट शब्दांत हल्ला चढवला. राहुल गांधी प्रचारासाठी जिथे जिथे जातील तिथे तिथे काँग्रेसचा पराभव निश्चित आहे असा टोला त्यांनी लगावला. राहुल यांनी अमेठीच्या विकासासाठी काहीच केलेले नाही. भाजपने अमेठीतील विकासकामे हाती घेतल्याने काँग्रेस गोंधळली आहे. त्यातून ते भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत असे ते म्हणाले.

वडोदरा येथे घेतलेल्या सभेत ते बोलत होते. पक्षाध्यक्ष अमित शहा गुजरातमध्ये येतात तेव्हा राहुल इटलीला पळून जातात. तेव्हा त्यांना गुजरातची आठवण येत नाही असे ते म्हणाले. काँग्रेसने आतापर्यंत देशाला लुटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावले उचलली. काँग्रेसला ही गोष्ट पचनी पडत नसल्याने ते टीका करत असल्याचा आरोप योगी यांनी यावेळी केला. निवडणुकांच्या वेळीच काँग्रेसला अमेठीची आठवण होते असे योगी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या