योगी आदित्यनाथ आग्र्याचे नाव बदलणार? हे असू शकतं नवीन नाव

1639
yogi-happy

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबाद शहराचे नाव प्रयागराज केल्यानंतर आाता ते आग्रा शहराचे नाव बदलण्याच्या तयारीत आहेत. आग्राचे नाव बदलून अग्रवन करण्यात येणार असल्याचे समजते. अद्याप याबाबत अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र आग्र्याचे नाव बदलण्याबाबत सरकारने आंबेडकर विद्यापीठातील तज्ज्ञांकडून माहिती मागवली आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला मिळालेल्या माहितीनुसार पूर्वी आग्राचे नाव हे अग्रवन होते ते नंतर काही कारणास्तव बदलून त्याचे नाव आग्रा करण्यात आले होते. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा आग्र्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने अलाहबाद शहराचे नाव बदलून प्रयागराज करण्यात आले होते तर मुघल सराई या स्थानकाचे नाव दिनदयाल उपाध्याय ठेवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या