मोदींपेक्षाही योगी सरस; तेच पुढचे पंतप्रधान

17

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही सरस आहेत. तेच पुढचे पंतप्रधान असतील अशी मला आशा आहे, असे ‘ट्विट’ करून चित्रपट निर्माते-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आज खळबळ उडवून दिली.

योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदी यांची तुलना करून वर्मा यांनी आदित्यनाथ हे उत्तम नेते असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या टिवटिवाटामुळे नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. वर्मा यांनी दुसऱया एका ‘ट्विट’मध्ये अमेरिकेच्या राजकीय इतिहासात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सर्वात मोठा राजकीय विनोद म्हणून ओळखले जातील, अशीही टिप्पणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या