अभिप्राय

98

<< अरविंद दोडे  >>

मराठी कवितेच्या विश्वात कवयित्रींचे स्वतंत्र दालन आहे. ते विशाल आणि समृद्ध आहे. स्वातंत्र्योत्तर काळात त्याची समृद्धी अधिकच वाढल्याचे दिसते. त्या विश्वातल्या कथा आणि व्यथा या बहुतेक ‘बाईपणा’च्या असल्याचे लक्षात येते. स्त्रीयांचा अपमान, उपेक्षा आणि अपयश यांच्या काटेरी झुडपांमध्ये रक्तबंबाळ होण्याच्या वेदनांना कवितारूप दिलेल्या असंख्य ओळींवर आसवांची रिमझिम, डोळे पाणावतात अन्  वाचक आतल्या आत चिंतन करतो. अशीच अंतर्मुख करणारी कविता आहे योगिनी राऊळ यांची.

‘बाईपणातून बाहेर पडताना’ या संग्रहात योगिनीचा विद्रोही स्वर प्रकर्षाने जाणवतो,

अंतर, कायमचं मिटलेलं,

तरी कायमच असलेलं

एकमेकांच्या आठवणीतलं…

हे कटुसत्य पचवताना फार यातना होतात. त्यावर एक श्रद्धेचा उपाय म्हणून ‘विठ्ठलभक्ती’चे औषध गवसते अन् मग ती गाते,

नको नको रे सावळ्या

नको पाहू असा अंत,

जन कोपले कितीही

काळजात तुझी मूर्त…

अष्टाक्षरी यमकांतून व्यक्त झालेल्या भावना जितक्या मर्मस्पर्शी आहेत, तितक्याच मुक्तछंद कविता हृदयस्पर्शी आहेत. योगिनीच्या कवितेची विशेषता हीच आहे की, स्वत:कडे आणि जगाकडे फार तटस्थपणे पाहताना तक्रारीच्या स्वरापेक्षा सत्यकथनाचा स्वर अधिक सुरेल आहे. सतीश भावसारांचे मुखपृष्ठ अप्रतिम.

बाईपणातून बाहेर पडताना कवयित्री : योगिनी राऊळ प्रकाशक : सृजन प्रकाशन पृष्ठे : १२०, मूल्य : रु. १००/-

 

आपली प्रतिक्रिया द्या