बाळासाहेबांचा विश्वास सार्थ ठरवत तुम्ही कार्य करत आहात; ठाण्यात जैन मुनींचे उद्धव ठाकरे यांना आशीर्वाद

ठाण्यात जैन समाजाच्या कोकण शत्रुंजय जिनालय येथे आयोजित करण्यात आलेल्या अंजन शलाका महोत्सव प्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जैन मुनी॑ची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी जैन मुनि विजय नित्यानंद सूरीश्वरजी यांनी उद्धव ठाकरे यांना आशीर्वाद दिले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या विश्वासाने पक्षाची कमान आपल्या हाती दिली आहे त्याच विश्वासाने आपण कार्य करीत आहात, असे जैन मुनी म्हणाले. जैन मुनींच्या आशीर्वचनानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)