१९ वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या

25

सामना प्रतिनिधी । पिंपरी

पिंपरी-चिंचवडमध्ये विद्यानगर येथील आरएन चौकाजवळ एका अज्ञात इसमाने तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. सोमवारी रात्री १ ते पटाचे ६च्या दरम्यान ही घटना घडली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. इम्रान मुसा शेख (१९) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. हत्या झालेल्या तरुणावर यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तरुणाची गुन्हेगारी क्षेत्रातील संबंधावरून हत्या झाली असावी, असा अंदाज पोलिसांना आहे. त्याच अनुषंगाने पोलीस सध्या तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या