मला निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी देऊ द्या!

2970

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील गुन्हेगारांना मला फाशी देऊ द्या अशी मागणी आंतरराष्ट्रीय शूटर वर्तिका सिंह हिने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून तिने ही मागणी केली आहे.

या गुन्हेगारांना तिनेच फाशी का द्यावी याचे कारणही तिने पत्रात लिहिले आहे. ‘त्या गुन्हेगारांना माझ्यासारख्या महिलेकडून फाशी दिली पाहिजे. त्यामुळे समाजात एक संदेश जाईल की एक महिलाही फाशी देऊ शकते. यासाठी महिला खासदार आणि कलाकारांनी मला पाठिंबा द्यावा. असे झाले तरच समाजात बदल होईल.’ दिल्लीत 2012 मध्ये चालत्या बसमध्ये निर्भयावर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला. अल्पवयीन असल्यामुळे एकाची सुटका झाली तर त्यातील एकाने तिहारमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. उर्वरित चार जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या