धावत्या बाईकवर आलेल्या मांजाने गळा चिरला, चिमुरडीचा मृत्यू

362
file photo

बाईकवरून चाललेल्या एका पाच वर्षीय चिमुरडीचा पंतगाच्या मांजामुळे गळा चिरला गेल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना नवी दिल्लीतील खजुरी या भागात घडली.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, येथे राहणारं एक कुटुंब मोटर बाईकवरून मंदिरात निघालं होतं. वाटेत बाईकच्या दिशेने आलेला मांजा कुटुंबातील पाच वर्षांच्या मुलीच्या गळ्याला आवळला गेला. तो फास इतका घट्ट होता की त्यामुळे मुलीचा गळा चिरला गेला. तिला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे तिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

काही दिवसांपूर्वी पतंगाच्या मांजामुळे एका 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. आपल्या स्कुटरवरून चाललेल्या या तरुणाच्या गळ्याभोवतीही अशाच प्रकारे मांजा लपेटला गेला आणि गळा चिरल्याने त्याचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या