युटय़ूब सिंगर बनण्यासाठी मुलीने घर सोडले

युटय़ुब सिंगर बनण्यासाठी घर सोडून आलेल्या अल्पवयीन मुलीला छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे पोलिसांनी अखेर शोधून काढले. त्या मुलीची रवानगी बालगृहात केली आहे.

ती मुलगी मूळची भोपाळची रहिवासी आहे. तिला युटय़ुबवर सिंगर बनायचे होते. मात्र तिच्या वडिलांनी तिला युटय़ुब सिंगर बनण्यास नकार दिला होता. सिंगर बनण्याचे स्वप्न पाहून ती मंगळवारी घरातून निघाली. मुलगी उशिरा घरी न आल्याने तिच्या घरच्यांनी तिचा शोध घेतला. अखेर तिच्या वडिलांनी भोपाळ पोलिसांकडे धाव घेतली. भोपाळ पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. ती मुलगी पुष्पक एक्प्रेस ने मुंबईतला जात असल्याची माहिती भोपाळ पोलिसांना मिळाली. भोपाळ पोलिसांनी ती माहिती छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे पोलिसांना दिली.

त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक प्रवीण भगत यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांना त्या मुलीचा आधारकार्डवरचा एक फोटो भेटला. त्यावरून तपासाची चक्रे फिरली. ती मुलगी पुष्पक एक्सप्रेस मध्ये असल्याची माहिती समजताच पोलिस फलाट क्रमांक 15 वर गेले. पोलिसांनी पुष्पक एक्प्रेसच्या प्रत्येक कोचची तपासणी केली. त्याच दरम्यान ती मुलगी गर्दीतुन लपत जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. अखेर पोलिसांनी त्या मुलीला ताब्यात घेऊन विचारपूस केली.

विचारपूस केल्यावर तिने ती भोपाळची रहिवासी असल्याचे पोलिसांना सांगितले. तिला युटय़ुब सिंगर बनायचे होते, मात्र तिच्या वडिलांना ती यु टय़ूब सिंगर बनणे पसंत नव्हते. त्यामुळे घर सोडल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्या मुलीची माहिती तिचे नातेवाईक आणि भोपाळ पोलिसांना कळवली.

आपली प्रतिक्रिया द्या