पिंपरीत विद्यार्थिनीची आत्महत्या, वडील रागावल्याने टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता

25

सामना ऑनलाईन,पिंपरी

पिंपरी येथे एका खासगी महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. शीतल गोपाळ जाधव (२०) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. शीतल ही फार्मसीचं शिक्षण घेत होती. शुक्रवारी तिने सकाळी दोन लेक्चरला हजेरी लावली मात्र मात्र तिसऱ्या लेक्चरला ती दिसली नाही. तिसरं लेक्चर सुरू असताना तिने महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारुन तिने आत्महत्या केली.

काही दिवसांपूर्वी शीतलच्या वडिलांनी तिला लॅपटॉप घेतला होता. त्यामध्ये बिघाड झाल्यामुळे दुरुस्त करण्यासाठी शीतलने मावशीकडून पैसे घेऊन लॅपटॉप दुरुस्त केला. याबाबतची जेव्हा तिच्या वडीलांना कळालं तेव्हा ते प्रचंड संतापले होते असं सांगण्यात येत आहे. तिच्या वडीलांनी तिला याबद्दल जाब विचारला आणि तिच्यावर हात देखील उगारल्याचं सांगण्यात येत आहे. तिच्या एका मैत्रिणीने ही माहिती दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या