टिकटॉक चॅलेंज स्वीकारण्यासाठी तरुणाने खाल्ले कुत्र्याचे अन्न; मग ‘हे’ घडलं, वाचा सविस्तर …

अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे राहणाऱ्या एका मुलाने शरीरात प्रथिनांची वाढ होण्यासाठी कुत्र्याच्या आहार घेण्यास सुरुवात केली. हा आहार घेत असल्याचा एक व्हिडियोसुद्धा त्याने सोशल मिडियावर शेअर केला आहे.

अमेरिकेतील बुफालो येथे राहणाऱ्या या तरुणाचे नाव हेनरी क्लेरीसे (21) असे आहे. प्रथिनांच्या वाढीकरिता तो कुत्र्याला दिल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांचे सेवन करू लागला. याविषयीचा त्याने तयार केलेला एक टीकटॉक व्हिडियो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडियोमध्ये तो सांगतो की,’ त्याने कुत्र्याला दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाचा एक छोटासा तुकडा खाल्ला.तो मला दगडाइतका कडक वाटला. कुत्र्याचं अन्न खायला अजिबात चांगलं नव्हतं. हे अन्न दातांनी चावून खाणं अतिशय कठीण होतं.’

या व्हिडियोविषयी सांगताना तो म्हणतो की, टिकटॉकवर एक चॅलेंज सुरू होते. ज्यामध्ये लोक प्रथिनांचे सेवन करण्यासाठी विचित्र पदार्थ खाण्याचे व्हिडिओ शेअर करत होते. त्यामुळे बुफालोनेही या आव्हानात सहभागी व्हायचे ठरवले. या चॅलेंजमध्ये काही लोकांनी खडूपासून बनवलेली स्मूदीही खाल्ली होती.

हेनरी क्लेरिसे म्हणाला, ‘मी नक्कीच अशा प्रकारचा प्रयत्न पुन्हा करणार नाही, कारण कुत्र्याचे अन्नात उच्च प्रतीची प्रथिने असले तरीही ते मानवी आहारायोग्य नाही.’ हेनरीने टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडियोला 15,000 लाईक्स मिळाले, तर तो कुत्र्याचे अन्न खाईल. कुत्र्याचे अन्न खाणे हा त्याच्यासाठी वाईट अनुभव होता, मात्र त्याच्या या व्हिडियोला 28 लाख व्ह्यूज आणि 25 लाख लाईक्स मिळाले.

पेडिग्री डॉग चाऊ हा डॉग फूडचा ब्रँड आहे. याविषयी एका पेडिग्री प्रवक्त्याने द पोस्ट या प्रसिद्धी माध्यमाला सांगितले की, जर एखाद्या व्यक्तिने कुत्र्याच्या या अन्नपदार्थांचे सेवन केले तर ते हानिकारक असू शकते. कुत्र्याचे अन्न खाणारा हेनरी ही पहिली व्यक्ती नाही. टेनिस खेळाडू सेरेना विल्यम्सने 2016 सालीदेखील असेच केले होते. याचा तिच्या तब्येतीवर गंभीर परिणाम झाला. फूड ब्लॉगर सिहाननेसुद्धा 2020 साली असेच केले होते.

अकॅडमी ऑफ न्यूट्रिशन अँण्ड डाएटिटिक्सने बजफीज न्यूजला दिलेली माहिती अशी की, कुत्र्याच्या अन्नात असलेले बहुतांश घटक हे मानवी अन्नासारखेच असले तरीही ते कुत्र्यांच्या शरीराची गरज भागवण्यासाठी असते, माणसांच्या नाही. प्राणी आणि माणसांच्या शारीरिक पोषणासंबंधित गरजा वेगवेगळ्या असतात.

एका हेल्थलाईननुसार, मांस, हाडे, अवयव, त्वचा आणि प्राण्यांच्या काही भागांपासून अनेक पाळीव प्राण्यांचे पदार्थ बनवले जातात जे व्यक्ती खाऊ शकत नाहीत. कुत्र्याचे अन्न खाल्ल्याने माणसाला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. काही ब्रँडेड डॉग फूडमध्ये व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन के 3 हे कृत्रिम स्वरुपात असते. जे जास्त प्रमाणात खाल्ले गेल्यास माणसासाठी धोकादायक ठरू शकते.