चुनाभट्टीत पार्किंगच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

पार्किंगच्या वादातून चौघांनी मिळून दोघा भावांना जबर मारहाण केल्याची घटना चुनाभट्टी येथे घडली. त्यापैकी एका भावावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून चुनाभट्टी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

कुर्ला पूर्वेकडील कुरेशी नगरात राहणारा जिशान शेख (32) याच्या भावाचा त्याच परिसरातील गुलिस्तान इमारतीजवळ पार्ंकगच्या वादातून आरोपींसोबत वाद झाला होता. त्यावेळी आरोपींनी सिमेंट ब्लॉकने जिशानला मारहाण करीत त्याला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यावेळी जिशानचा भाऊ मध्यस्थीसाठी आला असता आरोपींनी त्यालादेखील जबर मारहाण केली. याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.