पुणे – फेसबुकवर ओळख झालेल्या मित्राने तरुणावर बलात्कार केला

फेसबुकवरून ओळख झाल्याचा गैरफायदा घेत वकिलाने तरुणावर अनैसर्गिक अत्याचार केला. ‘त्याचे नग्न फोटो काढून तुझी बदनामी करेन’, असे सांगत सात लाखांच्या खंडणीची मागणी केली. परंतु, तरुणाने पैसे देण्यास वकिलाने तरुणाची आई व पत्नीकडून 20 तोळे सोने घेऊन फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवत 6 लाख 70 हजार रुपयांचा अपहार केला आहे.

याप्रकरणी दशरथ बावकर (वय 27, रा. ताथवड) याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 26 वर्षीय तरुणाने तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार तरुण आणि दशरथ यांची जानेवारी 2022 मध्ये फेसबुकवरून ओळख झाली होती. त्यानंतर ते भेटल्यावर दशरथने गोड बोलून भुरळ पाडली. त्याच्यासोबत विविध ठिकाणी अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करून त्याचे परस्पर नग्न फोटो काढले. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सात लाख रुपयांची तरुणाने नकार दिला असता, आरोपीने तरुणाच्या आईस ‘तुमचा मुलास मायग्रेनचा आजार आहे’, असे खोटे सांगितले. त्याच्यावर उपचारासाठी तरुणाची आई व पत्नी यांच्याकडून 20 तोळे सोन्याचे दागिने घेतले. ते दागिने गोल्ड लोनसाठी देऊन 6 लाख 70 हजार रुपयांचा अपहार केला. पोलीस उपनिरीक्षक एन. जाधव तपास करीत आहेत.