अवयव निकामी झाल्याने ‘त्या’ तरुणाचा मृत्यू

राजावाडी रुग्णालयात आयसीयूमध्ये गंभीर स्वरूपात अॅडमिट केलेल्या श्रीनिवास यल्लप्पा या तरुणाचा आज संध्याकाळी अवयव निकामी झाल्याने मृत्यू झाला अशी माहिती पालिकेच्या आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल यांनी दिली. या तरुणाच्या डोळ्याखाली सोमवारी रात्री उंदराने चावा घेतला होता.

राजावाडी रुग्णालयात श्रीनिवास यल्लप्पा (24) या तरुणाला दोन दिवसांपूर्वी दम लागतो म्हणून दाखल केले होते. त्याला मेंदुज्वर होता. तो दारू पित असल्याने त्याचे लिव्हर व इतर अवयव व्यवस्थित काम करत नव्हते. त्याला अॅडमिट केले त्याचवेळी त्याची प्रकृती गंभीर होती. आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. आयसीयू असताना त्याच्या डोळ्याखालील भागाचा चावा उंदराने घेतला होता. मात्र त्यामुळे त्याचा मृत्यू झालेला नाही. याप्रकरणी मृत युवकाच्या नातेवाईकाला नुकसानभरपाई देण्यात यावी अशी सूचना पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाला केली आहे. तसेच राजावाडी पालिका रुग्णालयामधील आयसीयू कक्ष खासगी संस्थेकडून काढून पालिकेने ताब्यात घ्यावा अशी मागणीही राजूल पटेल यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या