संशयावरून तरुणाची हत्या

वांद्रे येथे राहणाऱया तरुणाची हत्या प्रकरणी क्राईम ब्रँच युनिट 9 ने चौघांना काही तासातच बेडय़ा ठोकल्या. सलीम पठाण, अब्दुला शेख, उमर गफार शेख, शोएब शेख अशी त्यांची नावे असून त्यांना पुढील कारवाईसाठी वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिले. आज सकाळी वांद्रे पोलिसांना नियंत्रण कक्षातून पह्न आला. वांद्रे येथील अरुण कुमार वैद्य मैदान परिसरात एक जण जखमी अवस्थेत असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. त्यानंतर पोलीस तेथे गेले.

पोलिसांनी मृतांची ओळख पटवली. इब्राहिम शेख असे मृताचे नाव असून तो वांद्रे येथे राहत असल्याचे समोर आले. पोलिसांनी इब्राहिमला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. इब्राहिमच्या हत्ये प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला. याचा समांतर तपास क्राईम ब्रँच युनिट 9 करत होते. प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक पवार याच्या पथकातील सहायक निरीक्षक उत्कर्ष वझे, महेंद्र पाटील, पालकर, आदी पथकाने तपास सुरु केला.