इच्छाशक्ती हाच देव

कोणत्याही दैवी ताकदीपेक्षा स्वतःच्या इच्छाशक्तीवर विश्वास ठेवण्याविषयी सांगतोय, अभिनेता सुयश टिळक

देव म्हणजे ? –  विश्वास. देव ही संकल्पना फक्त मला छान वाटते, पण मी पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून नाही. आपण सगळेच जण कोणत्यातरी एका गोष्टीपासून आयुष्यात घाबरत असतो. त्याकरिता आपले स्वतःवर नियंत्रण असते. स्वतःवरील हे नियंत्रण म्हणजेच देव.

आवडते दैवत ? – गणपती बाप्पा

धार्मिक स्थळ ? – खास जावं असं कोणतंच नाही.

दैवी चमत्कारांवर विश्वास आहे का ? – कोणत्याही दैवी ताकदीवर विश्वास नाही. इच्छाशक्तीवर आहे.

अशी गोष्ट जी केल्यावर समाधान मिळतं? – मी खूप समाधानी माणूस आहे. कोणत्याही प्रकारचं काम केलं की, मला समाधान मिळतं.

दुःखी असतोस तेव्हा ? – जेव्हा दुःखी असेन तेव्हा  शांत बसून अशा गोष्टी शोधून काढतो ज्या माझ्याकडे आहेत आणि बाकीच्यांकडे नाहीत.

नास्तिक लोकांबद्दल काय सांगशील ? – देवाला मानलंच पाहिजे असा अट्टहास नाही.

ज्योतिषशास्त्रावर कितपत विश्वास आहे ? – वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला तर आहे, पण मी त्यावर अवलंबून नाही.

अभिनय आणि भक्तीची सांगड कशी घालता ? – अभिनय खूप भक्तीभावाने करतो.

मूर्तीपूजा महत्त्वाची वाटते की प्रार्थना ? – प्रार्थना मनापासून केली की देवापर्यंत पोहोचते.