दोन बायकांसोबत लाईव्ह सेक्स करून तरुण झाला लखपती, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सोशल मीडियाच्या माध्यमातून आज अनेकजण पैसे कमावतात. पण, या माध्यमाचा गैरवापर करणारेही पुष्कळ आहेत. असंच एक प्रकरण मध्यप्रदेशात उघड झालं आहे.

काय आहे हे प्रकरण

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेश पोलिसांनी 24 वर्षांच्या एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्यावर दोन विवाह करून आपल्या पत्नीसोबत लाईव्ह सेक्स करून पैसे कमावल्याचा आरोप आहे.

यासाठी तो वेगवेगळ्या अॅप्लिकेशनचा वापर करत असल्याचं उघड झालं आहे. तर ऑगस्ट महिन्यात त्याने या लाईव्ह सेक्सच्या माध्यमातूनच लाखो रुपये जमा केले आहेत.

कसं उघडकीला आलं?

या तरुणाच्या दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीमुळे हे प्रकरण उघडकीला आलं. तिने या तरुणावर जबरदस्तीने लाईव्ह सेक्स करायला भाग पाडत असल्याचा आरोप केला. ती सात महिन्यांची गरोदर आहे. तरीही तिला तो हे करण्यास भाग पाडत होता.

तिच्यासोबतचे शारीरिक संबंध रेकॉर्ड करून तो त्याच माध्यमातून तिला ब्लॅकमेल करत होता. अखेर तिचा संयमाचा बांध फुटला आणि तिने पोलिसात तक्रार केली.

तरुण आहे अवघा दहावी पास

हा तरुण अवघा 10वी पास आहे. पण त्याला संगणक आणि अॅप्लिकेशनबाबत खूप माहिती आहे. त्याने अनेक डेटिंग साईट्सवर प्रोफाईल उघडलं होतं. या तरुणाचा आधीच एक विवाह झाला असून दोन्ही पत्नींना एकमेकींबाबत काहीही माहीत नाही.

या दोघींसोबत तो लाईव्ह सेक्स करून त्या बदल्यात डेटिंग अॅप्लिकेशनवरून पैसे कमवत होता. रोज तीन ते चार हजार रुपये या माध्यमातून त्याला मिळत होते. यासाठी ऑगस्ट महिन्यात त्याने काढलेल्या अकाउंटमध्ये तब्बल सहा लाख रुपये जमा झाल्याचं उघड झालं आहे.

या तरुणाला अटक करून झाल्यानंतर त्याची चौकशी केली तेव्हा त्याने लाईव्ह सेक्सच्या माध्यमातून पैसे कमवत असल्याचं कबूल केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या