पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणार्‍या कश्मिरी विद्यार्थ्यांना झोडपले

1857

कश्मीरमधील सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हुबळी येथील तीन कश्मिरी युवकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. त्यांच्या या घोषणांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी त्यांना चांगलाच चोप दिला. पोलिसांनीही त्यांना ताब्यात घेतले आहे.

14 फेब्रुवारी 2019 रोजी अदील अहमद या दहशतवाद्याने 350 किलोच्या स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफ जकानांच्या ताफ्यातील ट्रकवर धडकवली होती. यात 40 जवान ठार झाले होते. 14 फेब्रुवारी 2020 रोजी या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. ‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकातील हुबळी येथे हे तिन्ही कश्मिरी तरुण केएलई अभियांत्रिकी महाकिद्यालयात शिकत आहेत. पुलवामा हल्ल्याच्या वर्षपूर्तीला या तिघांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. या घोषणांचा त्यांनी एक व्हिडीओही बनवला. तो व्हिडीओ व्हॉट्सऍपकर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या तिघांना ताब्यात घेतले. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत असताना काही जणांनी या तिघांना पोलिसांच्या तावडीतून सोडवून चांगलेच बदडून काढले. हुबळी धारवाड येथील पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी तपास करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या