स्वस्तात कांदा विकणाऱ्या काँग्रेस नेत्याच्या हाताला तरुणाचा चावा

1113

सध्या कांद्याने देशभरात चांगलाच हलकल्लोळ माजवला आहे. सामान्यांच्या खिशाला कांद्याचे दर न परवडणारे झाल्यामुळे जेवणातून कांदा हद्दपार झाला आहे. त्यामुळे जिकडे कांदा स्वस्त मिळेल तिथे लोकांची गर्दी वाढताना दिसत आहे. अशातच एक विचित्र प्रकार घडला असून एका काँग्रेस नेत्यावर कांद्यापायी जखमी होण्याची पाळी आली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना उत्तराखंडच्या हल्द्वानी परिसरात घडली आहे. इथे स्वस्तात कांदा विकणाऱ्या एका काँग्रेस नेत्यावर एका तरुणाने हल्ला केला आणि त्याच्या हाताचा चावा घेतला. काँग्रेसचे नेते नंदन मेहरा यांनी लोकांना स्वस्तात कांदा मिळावा म्हणून हल्द्वानी परिसरात कांद्याचा स्टॉल लावला होता. अचानक तिथे आलेल्या मनीष बिष्ट नावाच्या तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. ही घोषणाबाजी थांबल्यानंतर त्याने काँग्रेस नेत्यांना शिवीगाळ करायलाही सुरुवात केली.

शिवीगाळ करता करता तो स्टॉलच्या आतही घुसू पाहत होता. तेव्हा नंदन मेहरा यांनी त्याला स्टॉलबाहेरच थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मनीषने त्यांच्या हाताचा कडकडून चावा घेतला. या घटनेत मेहरा यांच्या बोटांना दुखापत झाली. हा प्रकार पाहून तिथे उपस्थित असलेल्यांनी मनीषच्या हल्ल्यापासून मेहरा यांना सोडवलं आणि त्याची धुलाई करत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

आपली प्रतिक्रिया द्या