कात्रज तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

कात्रज तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. ज्ञानेश्वर शिवाजी पांचाळ (23, रा. कात्रज) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

पांचाळ आणि त्याचे मित्र रविवारी कात्रज तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहताना ज्ञानेश्वरची दमछाक झााल्यामुळे तो पाण्यात बुडाला. मित्रांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पांचाळचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. कात्रज तलाव परिसरात सुरक्षारक्षक नसल्याने दुर्घटना घडली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम यांनी केली आहे.