
भरधाव बाईकवरील नियंत्रण सुटल्याने उड्डानपुलावरून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. योगेश्वर चुटे असे मयत तरुणाचे नाव आहे. योगेश्वर चुटे हा मूळचा गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. नोकरीनिमित्त तो नागपूरमध्ये राहत होता. नागपुरातील एका फायनान्स कंपनीत चुटे काम करत होता.
नेहमीप्रमाणे बाईकवरून चुटे कामावर चालला होता. बाईक अतिवेगात असल्याने पारडी फायओव्हरवर वळण घेताना बाईकवरील नियंत्रण सुटले. यानंतर बाईक उड्डानपुलाच्या कठड्यावर आदळली आणि चुटे 50 फूट खाली कोसळला.
घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनी तात्काळ त्याला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघातात डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.