प्रेयसी गरोदर, प्रियकराने गळफासाचा फोटो पाठवून उचलले टोकाचे पाऊल

मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रियकराने गळफास घेताना फोटो पाठवला. आत्महत्येपूर्वी प्रियकराने प्रेयसीशी व्हॉट्सअॅपवर कॉल केला होता. याचदरम्यान प्रेयसीने प्रियकराला गर्भवती असल्याचे सांगितले. ते ऐकून त्याला धक्का बसला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले.

ही घटना मध्य प्रदेशातील समान ठाणे येथील संजय नगर येथील आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विनय कुमार द्विवेदी असे त्या तरुणाचे नाव आहे. अतरैला येथील एका घरात तो भाड्याने राहत होता. तरुणाने आत्महत्येपूर्वी फोटो प्रेयसीला पाठवला होता. घटनेच्या रात्री तरुणीने आपण गर्भवती असल्याचे तरुणाला सांगितले होते. त्यामुळे विनय प्रचंड घाबरला होता. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. पोलिसांना त्याच्या फोनमध्ये संशयित गोष्टी आढळल्या आहेत.

नातेवाईकांनी सांगितले की, विनय हे विद्युत विभागाच्या सब स्टेशनमध्ये मेन्टेनन्सचे काम करत होता. रविवारी त्याने सांगितले की, तो काम पूर्ण केल्यानंतर मित्राच्या घरी जेवायला जाणार. त्यानंतर तो घरी गेला. मात्र सकाळी कळले त्याचा मृत्यू झाला. पोलीस अधिकारी सुनील गुप्ता यांच्या माहितीनुसार, प्रेयसिशी बोलल्यानंतर काही वेळाने विनयने गळफास घेत असल्याचा सेल्फी प्रेयसीला पाठवला. सोमवारी सकाळी विनय खोलीतून बराच वेळ बाहेर आला नाही. तेव्हा मालकाला संशयास्पद वाटल्याने त्यांनी नातेवाईक आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले आणि त्यांनी त्याचा मृतदेह काढून संजय गांधी स्मृति चिकित्सालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

विनयचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला,. याप्रकरणी पोलीस सायबर सेलची मदत घेत आहेत. मृतकाच्या मोबाईलमधील डाटा तपासला जात आहे. तपासात प्रेयसीची भूमिका संशयास्पद वाटल्यास तिच्यावर कारवाई करण्यात येईल.