प्यार किया तो..! बुरखा घालून प्रेयसीला भेटायला गेला आणि …

प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते, असे आपण नेहमीच ऐकतो. तसेच प्रेम आंधळे असते असेही बोलले जाते. याच आंधळ्या प्रेमामुळे एक तरुण पोलिसांच्या हिटलिस्टवर आला. बुरखा घालून प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले. यानंतर या तरुणाच्या प्रेमकथेचे गुपित उलगडले.

आज तक‘ने दिलेल्या वृत्तानुसार, लखनौमध्ये एक तरुण बुरखा घालून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तरुणावर पाळत ठेवली आणि योग्यवेळी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तरुणाने आपली प्रेमकथा त्यांच्यापुढे मांडली. बुरखा घालून आपण प्रेयसीची भेट घेण्यासाठी जात होतो, असे तरुणाने सांगितले. प्रेयसीच्या घरच्यांनी ओळखू नये यासाठी तरुणाने ही शक्कल लढवल्याचे सांगितले.

प्रेयसीची भेट आणि …
बुरखा घालून प्रेयसीची भेट घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला लोकांनी ओळखले आणि त्याच्याभोवती गर्दी जमा झाली. काही लोकांनी तर चक्क त्याच्यासोबत सेल्फीही घेतले. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्या घरच्यांना फोन करून बोलावले. तरुणाने पुन्हा अशी चूक करणार नाही हे शपथेवर सांगितले तेव्हा पोलिसांनी त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. मात्र तरुणाचे फोटो व्हायरल होत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या