चारचाकी गाडीला लागलेल्या आगीत युवकाचा मृत्यू

प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन,नागपूर

नागपूरमध्ये बुधवारी एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडली. रिंगरोडने जात असलेल्या एका वॅगनार कारच्या चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि ती झाडावर आदळली. आदळल्यानंतर गाडीमध्ये स्फोट झाला आणि क्षणार्धात संपूर्ण गाडी पेटली. जायबंदी झालेल्या चालकाला वेळेवर बाहेर पडता न आल्यानं त्याचा गाडीमध्येच होरपळून आणि गुदमरून मृत्यू झालायय सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

गाडी जेव्हा झाडाला धडकली तेव्हा तिथल्या लोकांनी चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी गाडीची काच फोडण्यात आली. मात्र गाडीमध्ये स्फोट झाल्याने सगळे जण घाबरून तिथून बाजूला झाले. आणि त्यामुळे या तरूणाचा जीव गेला. असं सांगण्यात येत आहे की हा तरूण साईबाबानगर इथला राहणार आहे, डीएनए चाचणीनंतर त्याची ओळख पटवणं शक्य होईल