लातुरात गोळी घालून युवकाचा खून; माजी सैनिक व त्याच्या मुलाविरुध्द गुन्हा दाखल

1293

धमकी देणाऱ्या युवकाचा गोळी घालून खून करणाऱ्या माजी सैनिक व त्याच्या मुलाविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना लातूर शहरातील प्रकाशनगर भागात रात्री घडली.

मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास गणेश अण्णासाहेब गायकवाड आणि राहूल मन्नाडे यांच्यामध्ये वादावादी झालेली होती. त्याची माहिती गणेश याने आपल्या वडीलांना दिली होती. गणेश आणि राहूल यांच्यामध्ये फोनवरुन बाचाबाची झाली. त्यावेळी राहूल याने तूझ्या बापाला खल्लास करतो अशी धमकी दिली. गणेश यानेही मी घरीच आहे, तू घरी ये असे प्रतिआव्हान दिले. राहूल गायकवाड हा गणेश याच्या घरी आला असता गणेश याचे वडील माजी सैनिक अण्णासाहेब सदाशिव गायकवाड यांनी त्यांच्या कडील परवानाधारक बंदूकीतून राहूलवर गोळी झाडली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तो उपचार सुरु असताना मरण पावला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अण्णासाहेब सदाशिव गायकवाड आणि गणेश गायकवाड यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आचारसिंहता सुरु असताना पोलीसांनी परवानाधारक लोकांकडून शस्त्रे जमा करुन घेतली असती तर ही घटना घडली नसती असे म्हटले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या