तरुणाने केला कोंबडीवर बलात्कार, बायकोने बनवला व्हिडीओ!

एका तरुणाने विकृतीच्या सर्व सीमा ओलांडून एका कोंबडीवर बलात्कार केल्याचं वृत्त आहे. या बलात्काराचा व्हिडीओ त्याच्या बायकोने बनवल्याचं उघडकीस आलं आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, या तरुणाचं नाव रेहान बेग असं आहे. ब्रिटनच्या ब्रॅडफोर्ड येथील हे प्रकरण आहे. रेहान बेग याच्या खासगी संगणकात बाललैंगिक शोषण संबंधीचे काही फोटो असल्याचं येथील नॅशनल क्राईम एजन्सीला समजलं. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या मदतीने एजन्सीने बेगच्या घरावर धाड टाकली.

धाड टाकून त्याचा खासगी संगणक जप्त करण्यात आला. त्याची नीट तपासणी केली असता त्याच्या संगणकात खरोखर असे आक्षेपार्ह फोटो असल्याचं पोलिसांना आढळलं. त्यांनी जेव्हा त्याच्या संगणकाची आणखी खोलात तपासणी केली, तेव्हा त्यांना जे दिसलं ते धक्कादायक आणि किळसवाणं होतं. त्याच्या संगणकात एक व्हिडीओ होता, त्या रेहान कोंबडीवर बलात्कार करत असल्याचं दिसत होतं.

बलात्कारानंतर कोंबडी मरण पावली. हा व्हिडीओ त्याच्या पत्नीने बनवला होता. याहून गंभीर म्हणजे, अनेक कोंबड्यांवर त्याने बलात्कार केले आहेत. त्याच्याविरुद्ध ब्रॅडफोर्ड कोर्टात खटला उभा राहिला. त्याला या विकृत आणि बीभत्स गुन्ह्यासाठी तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्याच्या पत्नीला तो मारहाण करत असे आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे वागायला भाग पाडत असे. त्यामुळे तिला घरगुती हिंसाचारामुळे निर्दोष मुक्त करण्यात आलं. तरुणाचीही कृती अत्यंत घृणास्पद असल्याची टिपण्णी कोर्टाने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या