गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । करमाड

संभाजीनगर तालुक्यातील सटाणा येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

सटाणा येथील अनिल तुळशीराम जगधने (४०) हा संभाजीनगर शहरात ड्रायव्हरचे काम करायचा. कामानिमित्त तो तेथेच राहायचा. बुधवार, २१ रोजी सटाणा गावाकडे आला होता. गावातील स्वतःच्या गट नंबर १० मधील शेतात जाऊन आंब्याच्या झाडाला सकाळी १०.४५ च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. गावातील काही मुली शाळेत शेतकडील रस्त्याने जात असताना त्यांची जगधने यांनी आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले व आरडाओरडा केला. शेतात काम करत असलेले शेतकरी या मुलींचा आवाज ऐकून धावत तेथे आले आणि या घटनेची माहिती गावातील नागरिकांना कळविली. त्यांनी या बाबत करमाड पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने खाली झाडावरून खाली काढला. संभाजीनगर ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक बकाल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरदरचंद्र रोडगे, कृष्णा दाणी हे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या