सपना चौधरीच्या कार्यक्रमात दगडफेक

सामना ऑनलाईन । भोपाळ

बिग बॉसमुळे देशभरात प्रसिद्ध झालेली हरयाणवी डान्सर सपना चौधरीच्या लाईव्ह कार्यक्रमात चाहत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. सपनाचा कार्यक्रम पाहायला न मिळाल्याने चाहत्यांनी थेट स्टेजवरच दगडफेक केली, सुदैवाने त्यावेळी सपना स्टेजवर नसल्याने ती या हल्ल्यातून बचावली. मात्र या हल्ल्यानंतर सपनाला कार्यक्रम रद्द करून काढता पाय घ्यावा लागला.

सपना चौधरीचा गुरूवारी मध्यप्रदेशमधील चंबळ येथे एक शो आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सपना येणार हे कळल्यावर लांबून लांबून लोकं तिचा शो बघायला आले होते. आयोजकांना अपेक्षित गर्दीपेक्षा जास्त गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांना गर्दीला आवरणे देखील कठीण झाले होते. त्यामुळे अनेकांना कार्यक्रम स्थळावरून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या सपनाच्या चाहत्यांनी दगडफेक करायला सुरूवात केली. त्यामुळे पोलिसांना देखील या जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर पोलिसांनी हा कार्यक्रम रद्द केला.

बिग बॉसच्या अकराव्या सिझनमध्ये झळकलेली सपना चौधरीच्या चाहत्यांच्या संख्येत या रिअॅलिटी शोमुळे प्रचंड वाढ झाली आहे. सपना ‘बैरी कंगना – २” या भोजपूरी चित्रपटातून ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय. या चित्रपटात तिच्यावर दोन गाणी चित्रीत करण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या