पुणे – मोबाईल खरेदीच्या बहाण्याने तरुणीला सव्वा लाखांचा गंडा

354

मोबाईल खरेदी करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने तरुणीला ऑनलाईनरित्या मोबाईलसह 1 लाख 20 हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने ओएलएक्स वेबसाईटवर मोबाईल विक्रीसाठी जाहिरात दिली होती. त्यानुसार सायबर चोरट्याने तरुणीला संपर्क साधून विश्वास संपादित केला. जादा किंमतीचे आमिष दाखवल्याने तरुणीने संबंधिताने दिलेल्या पत्त्यावर मोबाईल पाठवून दिला. त्यानंतर 30 हजार रुपयेही पाठवून दिले. मात्र, त्यानंतर सायबर चोरट्याने संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या