19 वर्षांच्या तरुणीने जिंकली 1800 कोटींची लॉटरी, पण तिकीटच विसरली आणि…

दैव देतं आणि कर्म नेतं अशी एक म्हण आहे. असाच प्रकार इंग्लंडमधील एका तरुणीसोबत घडला आहे. तिला लागलेली कोट्यवधी रुपयांची लॉटरी फक्त तिच्या एका चुकीमुळे तिला गमवावी लागली आहे.

या तरुणीचं नाव रेचल केनेडी असं आहे. इंग्लंडमधील ब्राइटन विद्यापीठात ती शिकते. तिला आकड्यांशी संबंधित एक खेळ खेळायचा शौक आहे. हा खेळ एक प्रकारची लॉटरी आहे. ती हा खेळ नेहमी खेळते.

या आठवड्यात ती ज्या नंबर्सवर खेळत होती. त्या नंबर्सना जॅकपॉट लागला होता. ही रक्कम होती 182 मिलियन पाउंड्स अर्थात 1800 कोटी रुपये. इतक्या भल्या मोठ्या रकमेची लॉटरी लागल्याची माहिती मिळाल्यानंतर तिला भयंकर आनंद झाला. तिने या आनंदात सोशल मीडियावर एक पोस्टपण टाकली. पण…

पण, इथेच एक गडबड झाली. या लॉटरी यंत्रणेनुसार ज्या नंबरची निवड तुम्ही करता, ते नंबर छापलेलं तिकीट तुम्हाला खरेदी करावं लागतं. आपल्या नंबर्सना पैसे मिळणार या आनंदात ती होती. पण, तिचा तो संपूर्ण दिवस कामात आणि अभ्यासात निघून गेला.

दुसऱ्या दिवशी तिला ही चूक लक्षात आली आणि ती रडकुंडीला आली. पण, आता वेळ निघून गेली होती. ती लॉटरी भलत्याच एका माणसाला लागली होती.

आपली प्रतिक्रिया द्या